Saturday, July 18, 2020

⇰संभाव्य बदली २०२० मधील बदल्यांचा संभाव्य प्राधान्यक्रम 


Thursday, July 9, 2020

 👉👉सन 220-21 मधील शिक्षक बदल्या ह्या नवीन सुधारीत बदली धोरणानुसारच होणार...!



        आज आलेल्या ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार शिक्षक बदल्या ह्या सुधारीत धोरणानुसारच होणार हे मात्र निश्चित आहे. आणि कोविड 19 मुळे जरी बदल्या ह्या 15 टक्के च्या मर्यादेत करावयाच्या असल्या तरी याचा शिक्षक बदल्यांवर तिळमात्र परिणाम होणार  नाही.

★ आंतरजिल्हा बदल्याचा विचार करता एकूण कार्यरत शिक्षकांच्या 5 ते 7 टक्केपेक्षा जास्त बदल्या कोणत्याच जिल्ह्यात होत नाहीत त्यामुळे आंतरजिल्हा बदल्यांना यावेळेस बहुतेक कोणताही अडथळा होनार नाही.

★ अंतर्गत बदल्याचा विचार करता आपल्याकडे सर्वच जिल्ह्यात मागील ऑनलाईन बदल्यांचा पूर्वानुभव पाहता त्या 15 टक्केपेक्षा कमीच झालेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस बदल्या होणारच अशी आशा ठेऊयात.

Tuesday, July 7, 2020

➤➤➤कोविड १९ मुळे स्थगित झालेल्या सन २०२०-२१ मधील बदल्या ३१ जुलै २०२० अखेर पूर्ण करण्याचा शासन निर्णय 







Tuesday, May 5, 2020

➫सन 2020-21 या वर्षात होणाऱ्या बदल्यांना स्थगिती


⇒⇒⇒⇒⇒⇒⇒⇒⇒⇒

       आपल्या महाराष्ट्रात जवळपास मार्च 2020 पासून कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने दि.21 मार्च 2020 पासून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या अर्थव्यस्थेवर त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने आर्थिक उपाययोजना राबवण्यासाठी दि.04 मे 2020 रोजी शासन निर्णय काढला असून त्यानुसार राज्यातल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या या आर्थिक वर्षातील बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
        शिक्षक बंधू-भगिनींच्या दृष्टीने बदली हा खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असतो.मागील दोन वर्षांपासून जिल्हाअंतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने होण्यास सुरुवात झाली.त्यात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ह्या बदल्या सन 2018-19 या वर्षी झाल्या तर कोकणात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात झाल्या. यात बहुतांश शिक्षकांना सोयीने बदल्या मिळाल्या मात्र कित्येक जणांची गैरसोय झाली होती त्या सर्वांना या 2020-21 साली होणाऱ्या बदल्यात सोयीने बदली होईल आणि ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या अनपेक्षित अश्याया कोविड 19 च्या संकटाने या अपेक्षांवर पाणी फेरले. आता पुढील शैक्षणिक वर्षाच्या बदल्या होईपर्यंत न्याय प्रतिक्षेतच राहील.
         या निर्णया संदर्भातील शासन निर्णय पुढील लिंकवर जोडला आहे त्यावर क्लिक करा व पहा

👇👇👇


👉 सन 2020-21 या वर्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांना स्थगिती दि.04-05-2020    [ DOWNLOAD ]